Land survey जमीन मोजण्यासाठी शेजारच्या शेतकऱ्याकडून विरोध होतो असा करा अर्ज

land survey शेती बंधाऱ्यांवरील वादांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असतानाच सध्या जमिनीच्या सर्वेक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी 550 शेतकरी जमीन गणनेसाठी अर्ज दाखल करत आहेत. भूमापनाचा अर्ज वाढला आहे, परंतु सर्वेक्षणाच्या वेळी अतिपरिचित सीमा आणि स्थळे निश्चित करण्यास विरोध आहे. अशावेळी भूमी अभिलेख कार्यालयाने संबंधित शेतकऱ्याला निमताना, सुपर निमताना मोजणीचा उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

मोजणीनंतर त्या क्षेत्राचे रकॉर्ड तयार करणे, क्षेत्र कोणत्या दिशेने दिसेला सरकते, सध्याच्या वहिवाटीचे क्षेत्र, या वावींचा विचार करून हद्द-खुणा निश्चित केल्या जातात. त्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याने तातडी, अतितातडीची मोजणीस विलंब लागतो. दरम्यान, जागा, जमिनीच्या वादाच्या सर्वाधिक तक्रारी तथा गुन्हे पोलिसांत दाखल होत असल्याचीही स्थिती आहे.

land survey Maharashtra मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करणे जरूरी

रोव्हर मशीनद्वारे मोजणीचा कालावधी कमी झाला, पण त्यानंतर संबंधित क्षेत्राचे रेकॉर्ड बनविणे, हद्द-खुणा कायम करण्यासाठी तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये मोजणीसाठी विलंब होतो, तरीदेखील तातडी, अतितातडी, अतिअतितातडीची मोजणी वेळेत पूर्ण केली जाते. ज्यांना त्यांच्या क्षेत्राची मोजणी करायची आहे, त्यांना आता ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑफलाइन अर्जाची पद्धत पूर्णतः बंद झाली आहे.

land survey map Maharashtraनिमताना, सुपर निमताना मोजणी म्हणजे काय?

एखाद्या शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज केला, त्याच्या क्षेत्राची मोजणी करताना शेजारील खातेदार त्यास हरकत घेतो आणि मोजणी अमान्य करतो. त्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मोजणी अर्ध्यावर ठेवून यावे लागते. अशावेळी संबंधित शेतकऱ्याला निमताना मोजणी करून घेता येते. पण, त्यासाठी पहिल्या मोजणीच्या तीनपट शुल्क भरावे लागते. त्या मोजणीवेळी तालुक्याचे भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक जागेवर येतात. याशिवाय सुपर निमताना मोजणीसाठी पाचपट शुल्क भरल्यास जिल्ह्याचे अधीक्षक त्या क्षेत्राच्या मोजणीसाठी तेथे जातात. त्यावेळी त्या क्षेत्राची मोजणी करून हद्द-खुणा कायम करून देतात.

मोजणीसाठी हेक्टरी दोन हजार रुपयांचे शुल्क

जमिनीच्या मोजणीसाठी हेक्टरी दोन हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. तर दोन हेक्टरसाठी तीन हजार रुपयांचा दर आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने ते शुल्क ऑनलाइन भरावे लागते.

Leave a Comment