ही गोष्ट कराल तरच मिळणार नुकसान भरपाई नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान यादीत नाव पहा

e pik pahani app ई-पीक पाहणी काही कारणात्सव करता आली नसेल तर शेतकऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. रविवारी (ता. १५) संपणाऱ्या ई-पीक पाहणीला आता ८ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आता अंतिम मुदत २३ सप्टेंबरपर्यंत असून ई-पीक पाहणी इंटरनेटशिवाय देखील करता येणार आहे.

ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीकपाहणी नोंदवण्यासाठी महसूल विभागाने दि. १ ऑगस्टपासून सुरुवात केली होती. पण अवकाळी पाऊस, सततच्या शासकीय सुट्ट्या, वीज पुरवठ्यासह तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता आली नाही. त्यातच ई-पिक पाहणी करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती.

ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

पण आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद केली नाही, अशा शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे.

याचबरोबर, शासनाने तलाठी स्तरावर देखील मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी तपासणीची मुदत वाढ झाली आहे. आता आता २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत सहाय्यक आणि तलाठी पीकपाहणी करू शकतील.

ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

इंटरनेटशिवाय पीकपाहणी

नाशिक विभागात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये दि. १३ सप्टेंबरपर्यंत १५ लाख ४८ हजार ६२२ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील ई-पीकपाहणी पूर्ण झाली आहे. तर जवळपास १६ लाख ४७ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर पीकपाहणीची नोंद अद्याप झालेली नाही. त्यावरून विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी ई-पीकपाहणी अॅपद्वारे शेतकऱ्यांनी पीकपाहणी नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ई-पीकपाहणी करण्यामध्ये काही समस्या उद्भवल्यास (०२०) २५७१२७१२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. तर जेथे इंटरनेट सुविधा नाही, त्याठिकाणी सुद्धा पीकपाहणी नोंदवण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment