“खेळताना रंग बाई होळीचा…” लावणीच्या कार्यक्रमात आजोबांचा जबरदस्त डान्स; एका VIDEO मुळे झाले फेमस

lavani viral dance सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

lavani viral dance त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजोबा बिनधास्तपणे डान्स करत आहेत. एका लावणीच्या कार्यक्रमात आजोबांनी जबरदस्त असा डान्स केला आहे. एवढ्या तरुणांमध्ये आजोबांचा उत्साह हा पाहण्यासारखा आहे. “खेळताना रंग बाई होळीचा होळीचा” या गाण्यावर आजोबांनी चांगलाच ठेका धरलाय.

आजोबांच्या आजूबाजूला तरुण दिसत आहेत, ते आजोबांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. आजोबांनी नाचताना चष्मादेखील लावला आहे. या आजोबांचे नेमके वय माहीत नसले तरी ते ७० च्या आसपास असेल असा अंदाज आहे. या वयातही हे इतक्या उत्साहाने करत असलेला डान्स पाहून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. या आजोबांच्या चेहऱ्यावर या वयातही असलेला उत्साह आपल्यालाही एनर्जी देणारा ठरू शकतो.

 

Leave a Comment