‘अप्सरा आली’ आणि आता ‘झिंगाट’वर साई पल्लवीने धरला ठेका व्हिडिओ झाला तुफान वायरल

sai pallavi dance बॉलीवूड असो की साऊथ सिनेमा, प्रत्येकजण ‘झिंगाट’ गाण्याचे फॅन आहे. 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ चित्रपटातील हे गाणे आणि चित्रपट खूप लोकप्रिय झाले होते. हे गाणे चित्रपटाच्या हिंदी आणि कन्नड आवृत्त्यांमध्ये देखील वापरले गेले होते, त्यामुळे त्याची लोकप्रियता केवळ मराठीपुरती मर्यादित नव्हती तर ती बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही पसरली होती. साऊथ अभिनेत्री सई पल्लवीने नुकतेच या गाण्याच्या हिंदी व्हर्जनवर डान्स केला असून तिचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://twitter.com/i/status/1832808127894266320

‘अप्सरा आली’ या मराठी गाण्यावर साई पल्लवीने तिच्या बहिणीच्या लग्नात केलेल्या नृत्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तिच्या दिलखेचक अदांनी आणि नृत्य कौशल्याने तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. आता तिचा ‘धडक’ सिनेमातील ‘झिंगाट’ या गाण्यावरील नृत्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

https://twitter.com/i/status/1832808127894266320

हा डान्स तिने तिच्या बहिणीच्या लग्नसोहळ्यातच केला होता. लग्नानंतरचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यातच हा व्हिडीओसुद्धा शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये साई पल्लवी तिच्या कुटुंबीयांसह ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकत असल्याचं दिसत आहे. धडक सिनेमात झिंगाट गाण्याच्या ज्या डान्स स्टेप होत्या, हुबेहुब त्याच स्टेप्स साई पल्लवीने केल्या आहेत. ती तिच्या कुटुंबीयांसह या मराठी गाण्यावर थिरकली आहे. हा व्हिडीओ अनेक फॅन पेजेसवर शेअर केला गेला आहे.

Leave a Comment